Share

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची होणार आज घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : निर्धारीत कार्यक्रमानुसार मागील वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलत यजमानपद भारताला देण्यात आले. मात्र भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे ही स्पर्धा येत्या १९ ऑक्टोबरपासुन युएई येथे सुरु होणार आहे.

युएई येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी भारतीय वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार आहे. आयसीसीने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतीय क्रिकेटपटु दिनेश कार्तिक या कार्यक्रमाचा भाग असणार आहे. कार्तिकसह वेस्ट इंडिज संघाच्या वर्ल्डकप संघाचा सदस्य डॅरेन समी आणि महिला क्रिकेटपटु इशा गुहादेखील या कार्यक्रमाचा भाग असतील.

https://twitter.com/ICC/status/1427477497940164613

येत्या १९ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यात सुरुवातील पात्रता फेरीचे सामने होतील. पात्रता फेरीतील पहिल्या चार संघाना प्रमुख स्पर्धेत संधी देण्यात येईल. महत्वाची बाब एकवेळच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेत्या श्रीलंका संघाला पात्रता फेरी खेळावी लागत आहे. तर अफगाणिस्तान संघाला थेट मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!