अमरावती : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर, विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत जात शिवसेनेनं महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात महाविकास आघाडीतील कुरबुरी समोर आल्या असल्या तरी हे सरकार ५ वर्षे टिकेल अशी खात्री तिन्ही पक्षातील नेते व्यक्त करत आहेत.
दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अनेकदा शिवसेनेला पुन्हा भाजपसोबत येण्यासाठी साद घातली आहे. आता पुन्हा एकदा आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना टिकवायची असेल तर भाजपसोबत युती करा असा सल्ला दिला आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.
‘जर शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडावी. नाहीतर शिवसेनेचं 2024 मध्ये खूप मोठं नुकसान होईल. या सरकारमध्ये नेहमी भांडण होत असतात. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही,’ असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपी संजय राठोड अद्यापही मोकाट कसा?’, चित्रा वाघ यांचा सवाल
- राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाई जगताप यांचेही खाते ट्विटरकडून निलंबित
- ‘…ही तर लुटु पुटुची लढाई’; ट्विटर वादावरून अभिनेत्याने काँग्रेसला डिवचले
- ‘शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला’, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- शाळांच्या १५ टक्के शुल्क कपातीचा जीआर जारी, जाणून घ्या सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
