🕒 1 min read
पुणे : भारतासह जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. २०२० सह २०२१ च्या सुरुवातीला देखील कोरोना रोगाने देशात थैमान घातल्याने हजारो लोकांना प्राण गमवावा लागला आहे. पुण्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर घातला होता. आता पुण्यातील कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि सण-उत्सव यामुळे अधिक संसर्गाची भीती वैद्यकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवाला आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असून वातावरण निर्मिती देखील होत आहे. श्रावण सुरु झाल्या झाल्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असून देश-विदेशातून भव्य सोहळा पाहण्यासाठी लोक येत असतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा उत्सव पुण्यात साजरा करण्यात येत असून सार्वजनिक गणेशोत्सवाला आता सव्वाशे (१२५) हुन अधिक वर्षांची परंपरा आहे.
वर्षानुवर्षे या उत्सवाची भव्यता वाढत असताना मागील वर्षी देशात कोरोनाचा प्रसार झाला आणि सर्व धर्मियांना सण-उत्सव हे साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. आता कोरोनाचा धोका हा पूर्णपणे मिटला नसल्याने आणि लसीकरणाचे प्रमाण देखील समाधानकारक नसल्याने संभावित धोका लक्षात घेता व सामाजिक भान राखून या वर्षीचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्याचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जाहीर केले आहे. उत्सवाच्या नियोजनाबाबत मंडळांची आज एक बैठक पार पडली.
या बैठकीत घेतलेला निर्णय सांगत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तमाम गणेशोत्सव मंडळे आणि गणेशभक्तांचे आभार मानले आहेत. ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलाम ! समाजभान जपत आगामी गणेशोत्सव यंदाही साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय आज गणेशोत्सव मंडळांनी आपण आयोजित केलेल्या बैठकीत एकमताने घेतला. याबद्दल सर्व मंडळांचे शतशः धन्यवाद ! गेल्यावर्षीही संकटकाळात हाच निर्णय सर्वात आधी आपल्याच मंडळांनी घेतला होता,’ असं कौतुक मोहोळ यांनी केला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलाम !
समाजभान जपत आगामी गणेशोत्सव यंदाही साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय आज गणेशोत्सव मंडळांनी आपण आयोजित केलेल्या बैठकीत एकमताने घेतला. याबद्दल सर्व मंडळांचे शतशः धन्यवाद ! गेल्यावर्षीही संकटकाळात हाच निर्णय सर्वात आधी आपल्याच मंडळांनी घेतला होता.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 12, 2021
दरम्यान, यावर्षी जरी हा गणेशोत्सव साधेपणाने होणार असला तरी पुढील वर्षी तरी कोरोनाचे संकट हे मुळापासून दूर होऊन, सर्वांना चांगले आरोग्य व सत्कार्य करण्याची बुद्धी दे अशीच मागणी बाप्पाकडे गणेशभक्त करत आहेत. यासोबतच, आधी सारखेच जोशात-उत्साहात आणि धडाक्यात बाप्पाचे आगमन आणि उत्सव पूर्ण करता येवो अशी इच्छा व्यक्त देखील व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या नावाने चाकणमध्ये पैशांची मागणी; मंत्रालयानंतर आणखी एक प्रकरण आले समोर
- ‘मेळघाटातील ४९ नवजात शिशुंच्या मृत्युला यशोमती ठाकूर जबाबदार’, खा.नवनीत राणा स्मृती इराणींच्या भेटीला
- ‘अभाविप’ ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनोखे उपक्रम राबविणार
- ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय!’; बदलीसाठी थेट मंत्रालयात आलेल्या ‘त्या’ फोनमुळे खळबळ
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाबाबत खा. प्रीतम मुंडेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
