🕒 1 min read
मुंबई : कोरोना महामारीचे संकट राज्यासह देशात आल्यापासूनच सर्व धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. श्रावण हा महिना हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो अशातच आता सरकारने आतातरी मंदिर उघडावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे.त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे आणि काही जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मंदिरं उघडणे आणि लग्न समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत वाट पहावी लागेल असं स्पष्टपणे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सरकारने मंदिरांच्या बाबतीत घेतलेल्या या भूमिकेवर भाजपकडून सातत्याने टीका होत आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील याच मुद्यावरून सरकारवर टीका केली आहे.१५ ऑगस्ट नंतर अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी मंदिरांवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. श्रावण महिन्याचे धार्मिक महत्व लक्षात घेऊन मंदिरांवरील निर्बंध उठविण्याची गरज होती. मात्र हे निर्बंध कायम ठेवून आघाडी सरकारने आपल्याला हिंदूंच्या भावनांशी देणे घेणे नसल्याचेच दाखवून दिले आहे अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांचे महाबीज शासनाने सोडलं वाऱ्यावर; शेतकऱ्यांसोबत अनिल बोंडे करणार ठिय्या आंदोलन
- निराशादायक! इस्त्रोची जीएसएलव्ही- एफ १० उपग्रह मोहीम अपयशी
- आयपीएल तयारीसाठी माही चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल, व्हिडीओ व्हायरल
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- ‘केंद्राच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा, आता महाविकास आघाडीने इच्छाशक्ती दाखवावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
