🕒 1 min read
नवी दिल्ली: बुधवारी चर्चेदरम्यान सभागृहात विरोधी बाकांमधील जागेत सुरक्षा मार्शलला पाचारण करण्यात आले. यावेळी सुरक्षा रक्षकांकडून महिला खासदारांना मारहाण करण्यात आली असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले हे प्रकरण म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज गुरुवारी विरोधी पक्षांनी मार्शल प्रकरणावरून आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.दरम्यान यावेळी राहुल गांधीसह १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
Today, we had to come out here to speak to you (media) as we (Opposition) are not allowed to speak in the Parliament. This is murder of democracy: Congress leader Rahul Gandhi, with Opposition leaders, at Vijay Chowk in Delhi pic.twitter.com/CYg0y4eEbX
— ANI (@ANI) August 12, 2021
राज्यसभेत विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी मार्शलचा वापर केल्याचा आरोप करत दिल्लीत विजय चौक येथे विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी हातात फलक घेऊन केंद्राचा निषेध केला. विरोधक रस्त्यावर उतरून या प्रकरणी आंदोलन करीत आहेत. दरम्यान सदरील ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. आम्ही पेगासस, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, पण संसदेत बोलण्याची परवानगी नव्हती. आज तुमच्याशी बोलण्यासाठी आम्हाला इथे यावे लागले’. असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. काल देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खळबळ! ‘रावसाहेब दानवेंनी पैशाचे वाटप करून माझा पराभव केला’, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप
- निराशादायक! इस्त्रोची जीएसएलव्ही- एफ १० उपग्रह मोहीम अपयशी
- आयपीएल तयारीसाठी माही चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल, व्हिडीओ व्हायरल
- गोंधळात गोंधळ : १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला ठाकरे सरकारची स्थगिती
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
