🕒 1 min read
नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर आज गुरुवारी विरोधी पक्षांनी मार्शल प्रकरणावरून दिल्लीत आंदोलन केले.यावेळी विजय चौकापर्यंत संयुक्त मोर्चा काढला. हे आंदोलन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.दरम्यान यावेळी राहुल गांधीसह १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.
राज्यसभेत विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी मार्शलचा वापर केल्याचा आरोप करत दिल्लीत विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केले आहे. यावेळी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी हातात फलक घेऊन केंद्राचा निषेध केला. विरोधक रस्त्यावर उतरून या प्रकरणी आंदोलन करीत आहेत. यामुये सदरील ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.
देश में दलितों, गरीबों, किसानों व मज़दूरों की एक आवाज़ आपको सुनाई देगी, यह आवाज़ धीरे धीरे तूफान बन जाएगी, और यही तूफान नरेंद्र मोदी की तानाशाही सरकार को उखाड़ फेंकेगी।
– श्री @RahulGandhi#HallaBol #CongressWithDalits pic.twitter.com/U7zuLdw27O— Delhi Congress (@INCDelhi) August 12, 2021
Yesterday, for the first time in the history of our country, members of the Rajya Sabha were manhandled and physically beaten. This was nothing short of murder of democracy: Congress leader Rahul Gandhi at a party event in Delhi pic.twitter.com/rRg3TcB4Gz
— ANI (@ANI) August 12, 2021
दरम्यान मार्शल प्रकरणी राहुल गांधी तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांना मारहाण करण्यात आली.असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे. यावेळी विजय चौक येथे ‘आम्ही पेगासस, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, पण संसदेत बोलण्याची परवानगी नव्हती. आज तुमच्याशी बोलण्यासाठी आम्हाला इथे यावे लागले’. असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. काल देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आलं आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रेट भेट! सलमानने शेअर केले मीराबाईसोबतच्या भेटीचे फोटो
- निराशादायक! इस्त्रोची जीएसएलव्ही- एफ १० उपग्रह मोहीम अपयशी
- आयपीएल तयारीसाठी माही चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल, व्हिडीओ व्हायरल
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
