Share

‘स्वबळा’च्या घोषणेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर नाना पटोले प्रथमच औरंगाबादेत!

Published On: 

औरंगाबाद : शहर काँग्रेसने स्वातंत्र्य दिनानिमित्त १६ ऑगस्ट रोजी ‘व्यर्थ न जाये बलिदान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर तसेच काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्यानंतर नाना प्रथमच शहरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्वबळाच्या तयारीसाठीच नाना शहरात येत असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी (दि.१६) निराला बाजार येथील तापडिया नाट्यगृहात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहतील. यावेळी सावर्जनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी दिली.

विविध सामाजिक कार्यकर्ते, उच्चशिक्षित तरुण काँग्रेस पक्षामध्ये यादिवशी प्रवेश करणार असून प्रवेशाचा कार्यक्रम सुद्धा नाना पटोलेंच्या विशेष उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे. याच दिवशी गांधी भवन येथे मराठवाड्यातील चार जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमात काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!