Share

‘क्रीडा’ विद्यापीठ औरंगाबादेत येईलच, फडणवीसांनी पळवलेले ‘आयआयएमही’ परत आणा- राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला जाहीर झाले होते. त्यामुळे औरंगाबादलाच मिळायला हवे होते. त्यावर सर्वप्रथम औरंगाबादकरांचा हक्क आहे. मात्र जरी क्रीडा विद्यापीठ गेले असले तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे दुसरे कोणते तरी विद्यापीठ नक्कीच या ठिकाणी येईल. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटना नक्कीच प्रयत्न करेल. त्यासोबतच देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादेतून नेलेले आयआयएम विद्यापीठही परत याठिकाणी आणा. हि आमची आग्रही मागणी राहिल. असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे औरंगाबाद अध्यक्ष दत्ता भांगे यांनी व्यक्त केले.

औरंगाबादला जाहीर झालेले क्रीडा विद्यापीठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याला जाहीर केले आहे. याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले, क्रिडा विद्यापीठ पुण्याला स्थलांतरित झाले तर भाजपचे सरकार असताना देखील आयआयएम नागपूरला पळवण्यात आले होते. त्याविषयीही स्थानिक भाजप नेत्यांनी बोलावे. मराठवाड्यावर आत्तापर्यंत अन्याय होऊ दिला नाही. आणि याही पुढे होऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांना याविषयी निवेदन देऊन क्रीडा विद्यापीठ परत आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रयत्न करेल.

मराठवाड्यावर अन्याय होत असेल तर सर्वपक्षीय नेत्यांनी पुढे यावे. असे त्यांना मी आवाहन करेल. असेही ते म्हणाले. तसेच क्रीडा विद्यापीठ परत मिळवण्यासाठी तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रयत्न करेलच. औरंगाबाद शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या करोडी येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा खेलो इंडिया स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली. त्यामुळे औरंगाबादेतील क्रीडा विद्यापीठाच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!