🕒 1 min read
औरंगाबाद : मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातील एका सहा वर्षीय मुलाने आई रागावल्याने घर सोडले. मराठवाडा एक्सप्रेसमध्ये बसून तो नगरसोलपर्यंत गेला. तेथील अधिकाऱ्यांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी त्याला ताब्यात घेऊन मंगळवारी सायंकाळी औरंगाबादेत आणून पालकांच्या स्वाधीन केले. रागाच्या भरात घरातून निघून गेलेला मुलगा सुखरूप परतल्याने आर्यनच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात राहणारा आर्यन राहुल ढगे (वय ६) कुरकुरे घेण्यासाठी आईने पैसे दिले नाही. आईने एक चापट मारली म्हणून त्याने थेट घर सोडले. तो नांदेड- धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेसमध्ये बसून निघाला. कुठे जायचे काहीच माहीत नाही. रागात घर सोडून थेट रेल्वेत बसला. यास रेल्वे सुरक्षा बल औरंगाबादचे नगरसोल इन्चार्ज विजय वाघ यांना धावत्या रेल्वेत तपासणी करत असताना तो दिसला. मुलाबरोबर आई-वडील कुणीही दिसले नाही. त्यामुळे त्याची चौकशी केली असता तो घरातून रुसून आला असल्याचे समोर आले.
सध्या आई-वडिलांनी रागावले किंवा अभ्यास न करणे यासह आदी कारणामुळे लहान मुले रागात घर सोडत आहेत. रागात घर सोडून थेट रेल्वे स्थानकावर येऊन मिळेल त्या रेल्वेत बसतात. कुठे जायचे माहीत नसते. अशावेळी पालक देखील आपल्या मुलांचा शोध घेतात. परंतु काहीवेळा पोलिसांना लहान मुले सापडतात, काही वेळा सापडतही नाही. अशावेळी लहान मुलांची पालकांपासून ताटातूट होते. त्यामुळे लहान मुलांनी रागात घर सोडू नये. पालकांनीही मुलांची तत्काळ समजूत घालावी. असे आवाहन आरपीएफचे निरीक्षक अरविंद शर्मा, विजय वाघ आणि रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आर्या आंबेकरचा हटके अंदाज पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो
- ‘जय श्रीराम न म्हणणाऱ्यांच्या डीएनएवर शंका’, योगी आदित्यनाथांचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘थोडेसे मायबाप’ सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांचा विरोध!
- कोकणवासियांच्या मदतीसाठी अभिनेता सुनील शेट्टीचा पुढाकार
- कोरोनाचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवा; आरोग्यमंत्री टोपेंचे आदेश


