Share

शेगाव संस्थानचे प्रमुख विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे आज दि. ४ ऑगस्ट, बुधवारी दुपारी ५ वाजता निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे आजारी होते. ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असे त्यांनी सांगितल्याने त्यांच्यावर राहत्या घरीच पूर्ण मेडिकल सेटअपसहीत उपचार सुरू होते. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांमधून शोक व्यक्त आहे. ‘श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे प्रमुख विश्वस्त श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःख दायक आहे. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.! संस्थानचे पावित्र्य जपण्याबरोबरच संस्थानला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. शिवशंकर भाऊ पाटील कायम स्मरणात राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.’ या शब्दांत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भावना व्यक्त केल्यात.

‘शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनामुळे आयुष्यभर निस्वार्थपणे संत गजानन महाराजांची सेवा करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. संस्थानच्या सेवाभावी कार्याच्या विस्तारामध्ये त्यांची भूमिका नेहमी स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’ असे ट्विट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!