Share

सामना एक, विश्वविक्रम तीन! ऑलिम्पिक स्पर्धेतील एक विलक्षण योगायोग

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑलिम्पिक स्पर्धा ही जगभरातील खेळाडूंसाठी एक पर्वणी असते. जगभरातील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन आपले सर्वस्व पणाला लावत पदक जिंकण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक स्पर्धेन अनेक विक्रम घडत असतात. मात्र एकाच सामन्यात अनेक विक्रम घडण्याची विलक्षण घटना समोर आली आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत एक नव्हे तर तब्बल तीन विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. या शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरणारा धावपटु नॉर्वेचा कार्सटन वारहोमने स्वत:चा यापुर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. कार्सटनने ही शर्यत ४५.९४ सेकंदात पुर्ण करत स्वत:चा ४६.६० सेकंदाचा विक्रम मोडीत काढला आहे. तर या स्पर्धेत दुसऱ्या स्थानी आलेल्या रौप्य पदक विजेत्या बेजामिनने ही शर्यात ४६.१७ सेकंदात पुर्ण करत स्वत:चा जुना विक्रम मोडीत काढला.

https://twitter.com/MediaWithSports/status/1422400667034038283

या शर्यतीत तीसऱ्या स्थानी असलेल्या कांस्यपदक विजेता ब्राझीलचा एलिसन डोस सांसोसने ०.०२ सेकंद आधीच म्हणजे ४६.७२ सेकंदात शर्यत पुर्ण केली. यासह एकाच शर्यतीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंनी विक्रम मोडण्याचा अनोखा योगायोग जुळुन आला आहे. सुवर्णपदक विजेत्या कार्सटनने शर्यंत जिंकताच अंगावरील जर्सी फाडून आनंद साजरा केला. त्याच्या या जल्लोषाचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!