Share

उद्धव ठाकरे यांनी जागवल्या बीडीडी चाळीतील आठवणी, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेला भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळींचा लवकरच कायापालट होणार आहे. 10 बाय 10 च्या खोल्या असलेल्या वरळीकरांना लवकरच आलिशान फ्लॅट मिळणार आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारतींचं बांधकाम होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आणि या बीडीडी चाळीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘लहानपणापासून माझे या चाळीत येणे जाणे होते. आमचे होमिपॅथीचे डॉक्टर इथेच राहायचे. शिवसेनाप्रमुखांच्यासोबत मी चाळीत यायचो. शाहीर साबळेंच्या घरीही जायचो. या चाळीच्या ऋणातून कधी मुक्त होऊ शकत नाही. या चाळीने खूप दिले आहे. माझ्या जन्माआधीपासून हा इतिहास आहे. त्या त्या वेळेला ही लोक उभी राहिली. अनेक कवी, गायक, साहित्यीक या चाळीने दिले. अनेक क्रांतीकारक निर्माण झाले, यात चाळीचा वाटा मोठा आहे, अशा काही आठवणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागवल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री पदावर असताना एका चांगल्या कार्याची सुरूवात माझ्या हस्ते होईल, असे स्वप्न कधी पाहिले नव्हते. आता चाळीचा टॉवर करतोय, पण त्यांनी आपल्याला जे दिले ते ऋण आपण फेडू शकत नाहीत. या चाळीच्या इतिहासाची मूळे खोलवर रुजलेली आहेत. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे असे लोकमान्य टिळक म्हणाले, पण त्या स्वराज्यात हक्काचे घर असायला हवे, तेच आम्ही करतोय, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना नमूद केले.

तसेच ‘संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात मुंबईतील हुतात्म्यांपैकी बीडीडी चाळीतील हुतात्म्यांचाही समावेश होता. मुंबई मिळवण्यासाठी या हुतात्म्यांनी सांडलेले रक्त हे वाया जाऊ देऊ नका. या चाळी म्हणजे हुतात्म्यांची आठवण आहे. त्यामुळे पिढ्यांची परंपरा तुटू देऊ नका. स्वतःचे घर झाल्यानंतर कोणी कितीही मोहात पाडेल, पण या घरांसाठीच्या मोहाला बळी ठरू नका असेही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. स्वराज्य हा जसा हक्क आहे, तसाच स्वराज्यात स्वतःचे घर असणे हादेखील हक्क आहे.’ असे मत यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!