🕒 1 min read
मुंबई : येत्या ५ ऑगस्टपासुन भारत आणि इंग्लंड संघादरम्यान पाच कसोटी सामन्याची मालिका होणार आहे. मात्र या मालिकेपुर्वी इंग्लंडच्या संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्स अनिश्चीत काळासाठी क्रिकेटपासून दुर झाला आहे.
भारताविरुद्धची मालिका काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. काही दिवसापूर्वी इंग्लंडने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघ घोषीत केला. मात्र या संघात समावेश असलेला इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्सने अनिश्चीत काळासाठी क्रिकेटमधुन ब्रेक घेतला आहे. काही महिन्यापुर्वी हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून पुर्णपणे सावरु न शकल्याने आणि मानसिक स्वास्थ ठीक रहावे म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाला आमचा संपुर्ण पाठींबा आहे. असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन सांगितले आहे.
Official Statement: Ben Stokes
— England Cricket (@englandcricket) July 30, 2021
या काळात इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्याला हवी ती मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील सोळा महिन्यापासुन कुटुंबापासून दुर राहत आणि बायोबबलमध्ये राहणे खरच आव्हानात्मक आहे. आगामी भारताविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या जागी समरसेटच्या क्रेग ओव्हरटनची इंग्लंड संघात निवड करण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी इंग्लंडच्या संघात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसिय मालिकेत बेन स्टोक्सने पुनरागन करत संघाचे कर्णधारपद भुषवले होते. या मालिकेत इंग्लंडने ३-० असा विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या दौऱ्याची अपेक्षा करण्यात चुक नाही; मदत उशिरा नको, वेळेवर द्या’
- ‘प्रत्येकवेळी अभिमान वाटेल अशी कामगिरी केली’, प्रियांकाकडून मेरीकोमचं कौतुक
- ‘भिंत बांधावी ही कल्पना, आग्रह नाही’; विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री ठाकरेंच स्पष्टीकरण
- ‘धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना राणेंचं अरे-तुरे इतके का झोंबावं?’
- ‘ज्या क्षणी अनिल देशमुख ‘अज्ञातवास’ मधून बाहेर येतील, सीबीआय आणि ईडी त्याला अटक करतील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
