Share

‘धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना राणेंचं अरे-तुरे इतके का झोंबावं?’

Published On: 

मुंबई : नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे – तुरे’ चे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे कां टोचले होते.

पाच वर्षे सत्तेत नसताना संकट आल्यावर आम्ही जात होतो त्यावेळी मी जिल्हाधिकारी आले नाही… प्रांत कुठे गेला…मामलेदार कुठे आहे असं कधीही म्हटलं नाही किंवा विचारले नाही. अरे तुम्ही जिल्हाधिकारी, मामलेदारांना बघायला आलात की जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलात असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला होता.

यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. ‘धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना नारायण राणेंचं अरे-तुरे इतके का झोंबावं?’ असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे ?

नारायण राणे हे २५ जून रोजी चिपळूणमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, ‘तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.” समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!