Share

‘मोदींच्या दौऱ्याची अपेक्षा करण्यात चुक नाही; मदत उशिरा नको, वेळेवर द्या’

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी देखील अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. गंभीर पुरस्थितीमुळे शेती, व्यापार यांच्यासह घरादाराचे मोठे नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ यानंतर राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पुन्हा या वर्षी देखील तौक्ते चक्रीवादळ आणि अतिवृष्टी यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असून केंद्राने देखील मोठा हातभार लावावा अशी मागणी राज्य सरकारद्वारे केली जात आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर मदतीसाठी केंद्रीय पथकाने पाहणी करून पंचनामे केले. शेतकरी वर्ग पुन्हा एकदा मोठ्या संकटात असताना वर्षाच्या कालावधीने केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींचे पॅकेज जाहीर केले असून भाजप नेत्यांनी याचे स्वागत केले आहे तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी ही मदत तुटपुंजी व उशिरा केली गेल्याची टीका केली आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळानंतर ज्याप्रमाणे गुजरातचा दौरा केला होता त्याप्रमनच महाराष्ट्राशी भेदभाव न करता दौरा करावा व तशीच मदत देखील घोषित करावी अशी मागणी केली होती. पूरस्थिती नंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी वडेट्टीवार यांच्या मागणीचे समर्थन केलं आहे.

‘पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची अपेक्षा करण्यात चुक नाही. ते पंतप्रधान आहेत. महाराष्ट्र मोठ्या संकटात असताना त्यांनी मदत केली पाहिजे, गेल्यावर्षी झालेल्या अतिवृस्ठीती मदत शेतकऱ्यांना या वर्षी मिळाली आहे. हा थोडा दिलासा आहेच. पण पुरामुळे झालेले नुकसान हे प्रचंड असल्याने आढावा झाल्यानंतर योग्य मदतीची शिफारस केली जाईल. त्यांनी मागील वर्षीप्रमाणे वेळ न घालवता वेळेत मदत करावी,’ असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार ?

‘राज्यात जुन ते ऑक्टोबर २०२० दरम्यान मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत केंद्राने आता जुलै अखेर घोषित केली. ३७२१ कोटी रुपयांच्या मदतीची राज्यातील शेतकऱ्यांना गरज असताना घोषित झालेली ७०० कोटींची मदत ही तुटपुंजी आहे,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

पुढे वडेट्टीवार यांनी, ‘तौक्ते चक्रीवादळानंतर मा.पंतप्रधानांनी गुजरातचा तत्काळ दौरा करून दुसऱ्याच दिवशी १००० कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशातील दोन राज्य असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतीवृष्टी नुकसानीची मदत एक वर्षानंतर का ? आणि ती सुद्धा तुटपुंजी? ढगफुटी व दरड कोसळण्याच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मोठी वित्त व प्राणहानी झाली आहे. महाराष्ट्र अश्या मोठ्या संकटाला तोंड देत असताना नरेंद्र मोदींनी सुद्धा जो न्याय गुजरातला तोच न्याय महाराष्ट्राला ही भावना ठेऊन नुकसानग्रस्त कोकणचा दौरा करावा,’ अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!