🕒 1 min read
औरंगाबाद : भाजप कोरोनाकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून न पाहता प्रचाराची संधी म्हणून पाहत आहे. लसीकरण मोहिमेद्वारे आपला राजकीय स्वार्थ साधत आहे. तसेच मनपाचे लसीकरण अधिकारी हे भाजपचे पदाधिकारी असून त्यांचाच प्रचार करत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे. यासंदर्भात युवासेना गुरुवारी (दि.२९) मनपा आयुक्त अास्तिक कुमार पांडेय यांची भेट घेणार असून लवकरात लवकर आळा न बसल्यास भव्य आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
शहरातील विजयनगरमधील लसीकरण केंद्रावर टोकण वाटपावरुन झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर गंभीर प्रकरणामध्ये झाले आहे. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि भाजप नगरसेविकेचे पती गोविंद केंद्रे यांच्यातील वादाने आता वेगळेच वळण घेतले आहे. भाजप गारखेडा येथील लसीकरण केंद्रावर प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात मंगळवारी युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मनपाच्या राज नगर लसीकरण केंद्रातील अधिकारी डॉ. संजय गंडेपाटील हे भाजप गारखेडा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. ते मनपाचे अधिकारी असूनही लसीकरणात भाजप मदत करत असल्याचा प्रचार करत आहेत. असा आरोप शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या नावाने फिरत असलेल्या मेसेजचा स्क्रीन शॉट समाज माध्यमांवर शेअर केला आहे.
याबाबत त्यांनी सांगितले, भाजपा लसीकरणाच्या आडून राजकारण करते. याचा हा पुरावा आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी स्वतःच राजकीय पद टाकून लसीकरणाच्या आडून पक्षाचा प्रचार करत आहेत. महापालिका आयुक्तांना यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर सीसीटीव्ही बसवावे. तरच सामान्य नागरिकांना हक्काची लस कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. याबाबत आज युवासेना शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार असल्याचे जंजाळ यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्तांसाठी मराठा क्रांती मोर्चाची धाव!
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- उस्मानाबाद जिल्ह्यात २९ आयुष्यमान रुग्णालये स्थापन करा- ओमप्रकाश राजेनिंबाळकर
- ‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये लेवल तीन चे निर्बंध कायम; राजेश टोपेंनी केली घोषणा
- कोरोना इफेक्ट! औरंगाबाद जिल्ह्यातील ३० शाळांमधील वर्ग पुन्हा एकदा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

