🕒 1 min read
मुंबई : एकेकाळी भारतीय क्रिकेट संघात अनेकदा मुंबईच्या खेळाडूंची संख्या अधिक असायची. आगामी इंग्लंड दौऱ्यात तेच चित्र पुन्हा एकदा उभे राहण्याची शक्यता आहे. आगामी इंग्लंडविरुद्ध तब्बल पाच खेळाडू हे मुंबईचे आहेत.
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ही ५ ऑगस्टपासुन सुरु होणार आहे. मात्र या मालिकेपुर्वी भारतीय संघाला दुखापतीने ग्रहण लागल्याने शुभमन गील, आवेश खान आणि वॉशिग्टंन सुंदर हे खेळाडू स्पर्धेबाहेर पडले आहेत. त्याच्याजागी भारतीय संघात पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांची संघात वर्णी लागली आहे. यापुर्वी भारतीय संघात अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकुर या मुंबईच्या खेळाडूंचा समावेश आहे.
सलामीवीर रोहित शर्मा हा भारताचा अनुभवी खेळाडू आहे. सलामीला तो इंग्लंड दौऱ्यात महत्वाची भूमिका पार पाडु शकतो. तर शुभमन गील जखमी झाल्यामुळे संघात पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ हा गेल्या काही दिवसापासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अजिंक्य रहाणे हा भारतीय संघाचा भरवश्याचा फलंदाज म्हणून ओळखला जातो. तर सुर्यकुमार यादवने पाच महिन्यापुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. पाच महिन्यात त्याने क्रिकेटच्या तिनही प्रकारात संघात स्थान पटकावले आहे. तर शार्दुल ठाकुरने यावर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगीरीमुळे चाहत्यांची मने जिंकली होती. २००७ पासुन भारतीय संघ इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकु न शकल्याने यंदाची मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानावर उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या
- जसप्रीत बुमराहने सलग सामन्यात भाग घेऊ नये ; शोएब अख्तरने व्यक्त केली चिंता
- कर्नाटक : बसवराज बोम्मई आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
- कृणाल पांड्या कोरोनाबाधित आढळल्याने शास्त्री-कोहली यांच्या चिंतेत वाढ
- दिलासादायक! कोरोनाबाधीत कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंची टेस्ट निगेटिव्ह
- अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ९ लाख रुपयांची मदत देण्यासाठी प्रयत्न : अजित पवार

