औरंगाबाद : पावसाळ्यात शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. अनेक ठिकाणी नाल्यांंवरील अतिक्रमण, साफसफाई अभावी अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. आत्तापर्यंत अनेकांच्या जीवावरही बेतले आहे. या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेच्या वतीने आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले होते. याकील संपर्कासाठी देण्यात आलेल्या दोन्ही फोन क्रमांकांवर संपर्क होतो, मात्र समोरून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. मागील दिड महिन्यांपासून या मदत केंद्राचा संपर्क क्रमांक बंद आहे. परिणामी, नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पालिकेची हि योजना देखील कागदोपत्रीच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पालिकेच्या टाउन हॉल परिसरातील मुख्य प्रशासकीय कार्यालयात नैसर्गिक आपत्ती विषयक तक्रारींसाठी, तसेच तात्काळ मदत कार्यासाठी पावसाळी नियंत्रण कक्ष सुरु केलेला आहे. ०२४०३३३५३६, ०२४०३३३५४० हे दोन्ही संपर्क क्रमांक यासाठी पालिकेने जारी केले आहेत. मात्र या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता दोन्ही क्रमांक लागत नाही. कर्मचार्यांनी सांगितल्यानुसार प्रशासकांच्या दालनासह पालिका मुख्यालयातील सगळे लँडलाइन संपर्क सध्या बंद आहे.
दलालवाडी येथे रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम करतांना बीएसएनएलचे कनेक्शनच्या वायर तुटल्यामुळे फोन बंद झाले असल्याचे कर्मचार्यांकडून सांगण्यात आले. संपर्क क्रमांकच बंद असल्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी थेट पालिका मुख्यालयातच जावे लागत आहे. त्या ठिकाणी गेल्यावरच मदत कक्षात बसलेले कर्मचारी संबधीत अधिकार्यांना मोबाइलवर फोन करतात, अशी अनोखी पद्धत सध्या पालिकेत सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक! बेरोजगारीमुळे हिंगोलीत तरुणाची आत्महत्या
- परभणीत विषारी गोळ्याच्या वायूमुळे दोन बालकांचा मृत्यू
- ‘राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही ; केंद्राला देऊन टाका’
- प्रियकरासोबत राहत असलेल्या महिलेला सासरच्यांकडून मारहाण
- पुणे शहरात आज नव्याने २५० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
