🕒 1 min read
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात अनेक किल्ले आणि सागरी किल्ले आहेत. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व असून या किल्ल्यांचे जतन, संवर्धन काळानुरुप होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मुंबईतील किल्ले, सागरी किल्ले, राज्य संग्रहालय आणि पुराभिलेख विभागाच्या योजनासंदर्भात मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव जाधव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालक तेजस गर्गे, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित उगले उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वैभव जपत असताना, गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करताना गड किल्ल्यांच्या ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याने यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राचे असे राज्य संग्रहालय उभारण्यात येणार असून हे संग्रहालय नेमके कुठे असावे, या संग्रहालयात काय काय असावे याबाबींचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्व संचालनालयाने यापूर्वीच एक समिती गठीत केली आहे. या समितीने कोविडच्या काळात दोन बैठका यापूर्वीच केल्या आहेत. राज्य संग्रहालयासंदर्भात पुढील बाबी ठरविण्यासाठी लवकरच सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात यावी, असे निर्देश अमित देशमुख यांनी यावेळी दिले.
कर्नाटक राज्यात शहाजी राजे यांची समाधी असून तेथे महाराष्ट्र शासनामार्फत त्यांचा पुतळा उभारता येईल हे पाहण्यासाठी पुरातत्व संचालकांनी स्वत: तेथे जाऊन त्या जागेची पाहणी करावी. आज पुराभिलेख संचालनालयाकडे ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा जतन करीत असताना डिजिटल स्वरुपात हा वारसा जतन करण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असेही अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- विद्यार्थ्यांचा संताप! हँग वेबसाइटमुळे अकरावी सीईटी परीक्षेची नोंदणी तूर्तास रद्द
- जावयाकडून परतताना अपघातात पती-पत्नीचा मृत्यू, सुदैवाने मुलगी बचावली
- महालगांवात शोरुमचे शटर तोडून दोन नवीन दुचाकींची चोरी
- ‘सर्वांनी एकत्र येऊन जनतेला या अस्मानी संकटातून सोडवले पाहिजे’
- ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

