🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातले आहे. रत्नागिरी, कोकण, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक पुणे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पावसाने कोकणात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७१ जण बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्या उतरल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर बचावकार्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्राला मदत मागितली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पूरस्थितीवर संवाद साधला. या चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ही पूरस्थिती लवकर आटोक्यात यावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
दरम्यान चिपळूण, पेढे, कर्जत, खेड, संगमेश्वर या ठिकाणी भयंकर पूरस्थिती झाली आली असून लोक जीव मुठीत घेऊन एकमेकांना सहकार्य करत आहेत. या ठिकाणचे मार्ग पावसामुळे बंद करण्यात आले असून या भागातील संपर्क तुटला आहे. त्यामुळे रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमार्फत मदत व बचावकार्य सुरू आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी २५ जवानांची २ पथके सज्ज झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भविष्यातही संघर्ष करावा लागणार’, पतीच्या अटकेनंतर शिल्पाची पहिली प्रतिक्रिया
- पराभवानंतर श्रीलंकेच्या संपूर्ण संघाला ‘या’ कारणामुळे भरावा लागणार दंड
- महाराष्ट्र रामभरोसेच आहे, हे वारंवार सिद्ध होतंय; आता पुराने यावर शिक्कामोर्तब केलंय’
- कोरोनावर मात केलेला रिषभ पंत मास्कमुळे झाला ट्रोल
- दीपक चाहरने धोनीला दिले मॅच-विनिंग खेळीचे श्रेय, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

