Share

पराभवानंतर श्रीलंकेच्या संपूर्ण संघाला ‘या’ कारणामुळे भरावा लागणार दंड

Published On: 

श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय युवा संघाने श्रीलंकेविरुद्ध आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली.

भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. अशात दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारनेजिंकण्याची अशा कायम ठेवत दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी करत श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

दरम्यान, श्रीलंका संघाला मालिका गमावल्यानंतर दुसऱ्या मालिकेतील ‘स्लो ओव्हर रेट’साठी दंड ठोठावण्यात आला आहे. निर्धारित वेळेत एक षटक कमी गोलंदाजी केल्याबद्दल आयसीसीने श्रीलंकेच्या संघाला सामना शुल्काच्या २० टक्के दंड ठोठावला. आयसीसीच्या नियमानुसार, निर्धारित वेळेत सर्व षटके गोलंदाजी करावी लागते. संघ असं करू शकला नाही तर त्याला सामना शुल्कापैकी किमान २० टक्के दंड ठोठावते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!