मुंबई : गेल्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यात भारताने जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना गमावला. या सामन्यानंतर भारतीय संघाला २० दिवसाची सुटी देण्यात आली. मात्र ही सुटी संपण्यापुर्वी भारतीय संघाला दुखापतीने ग्रासले आहे.
सुटीदरम्यान सलामीवीर शुभमन गीलला दुखापत झाल्याने तो इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला. यानंतर डरहम येथे काउंटी इलेव्हन संघासोबत सराव सामन्यादरम्यान आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडले आहे. यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या २४ खेळाडूपैकी केवळ २१ खेळाडू शिल्लक आहेत. यामुळे इंग्लंड दौऱ्यावर दोन भारतीय खेळाडूची निवड करावी अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात बीसीसीआय लवकरच निवड समितीसोबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन महिने चालणाऱ्या इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय खेळाडूंना दुखापतीचा धोका संभावू शकतो. त्यामुळे भारतीय संघाला पर्यायी खेळाडूंची गरज पडू शकते. प्रारंभी शुभमन गील दौऱ्यातून बाहेर पडल्यावर त्याच्या जागी पर्यायी खेळाडूची मागणी संघ व्यवस्थापनाने केली होती. मात्र त्यावेळी निवड समितीने नकार दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता जखमी खेळाडूंची संख्या वाढल्यानंतर निवड समिती लवकरच नव्या खेळाडूंची निवड करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- अखेर रसिका आणि असिफ यांचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पडला पार
- पक्षातील नेत्याच्या मुलीच्या विनयभंगा प्रकरणी राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री अडचणीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
