🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडमध्ये नावारूपाला आलेली अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. तिच्या चित्रपटाची नेहमीच चर्चा होत असते. मात्र काल ‘वर्ल्ड इमोजी डे’ निमित्त तिने शेअर केलेल्या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/reel/CRbbWZaJHGM/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडीओमध्ये सारा वेगवेगळ्या इमोजींच्या हावभावाची नक्कल करताना दिसत आहे. साराने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर तिच्या फॅन्सचा कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. तसेच अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या या मजेदार व्हिडीओचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओत साराने 30 सेकंदात 15 वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन दिले आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने सिंबा, लव्ह आज कल, कुली नंबर १ या चित्रपटात झळकली. सारा अली खानच्या लवकरच ‘अतरंगी रे’ चित्रपटातून भेटीला येणार आहे. याआधी तिचे बऱ्याच अभिनेत्यांसोबत नावही जोडले गेले. तसेच ड्रगज कनेक्शनमध्ये साराचेही नाव घेतले गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध’; चित्रा वाघ राऊतांवर कडाडल्या
- योगी महाराजांनी ‘तो’ कायदा लावलाच तर भाजपचे १६० आमदार बाद होतील; संजय राऊतांचा खोचक टोला
- ‘अमोल कोल्हे फार डोकं चालवू नका; ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलात, त्यांनाच विसरलात’
- ‘या’ 11 खेळाडूंना मिळू शकते श्रीलंकेविरुद्ध संधी
- पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीने केले जावयाचे कौतुक म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
