🕒 1 min read
मुंबई : मुंबईसह उपनगरमध्ये काल रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळली. दरडीचा भार संरक्षक भिंतीवर आल्याने ही भिंतच घरांवर कोसळली.
अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती घेऊन त्यांनी ट्विट केलं आहे. ‘ही घटना हृदयद्रावक असून मी स्तब्ध आहे. या दुर्घटनेत कुटुंबिय गमावलेल्या नागरिकांच्या दुःखात मी सहभागी आहे. न भरून निघणाऱ्या या नुकसानाप्रती मी संवेदना व्यक्त करतो,’ असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
मुंबई के चेंबूर में हुए हादसे की हृदयविदारक
सूचना से स्तब्ध हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। ईश्वर शोक संतप्त परिजनों को यह दुःख सहने की शक्ति प्रदान करें।— Amit Shah (@AmitShah) July 18, 2021
दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बी ए आर सी संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या भिंतीलगत असणाऱ्या काही झोपड्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आज सकाळी सातच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध’; चित्रा वाघ राऊतांवर कडाडल्या
- योगी महाराजांनी ‘तो’ कायदा लावलाच तर भाजपचे १६० आमदार बाद होतील; संजय राऊतांचा खोचक टोला
- ‘अमोल कोल्हे फार डोकं चालवू नका; ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलात, त्यांनाच विसरलात’
- ‘या’ 11 खेळाडूंना मिळू शकते श्रीलंकेविरुद्ध संधी
- पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीने केले जावयाचे कौतुक म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
