🕒 1 min read
पुणे : पुरंदर तालुक्यात होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवरून सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे. पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे अनेक दिवसांपासून करत आहेत.
त्यातच दोन दिवसांपूर्वी शरद पवार बोलताना म्हणाले कि, ‘नियोजित विमानतळासाठी तीन जागांची पहाणी करुन माहिती गोळी केली जात आहे.विमानतळासाठी अद्यापही कोणतीही जागा निश्चित केलेली नाही .तीन जागांपैकी जी जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असेल त्या ठिकाणी विमानतळ करावे लागणार आहे.’ मत शरद पवार यांनी मांडले होते. शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी देखील अद्याप जागा निश्चित नसल्याचे सांगत आणखी गुगली टाकली. यामुळे पुरंदर आणि खेड तालुक्यातील लोकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अद्याप पुरंदर विमानतळाबाबत जागा निश्चित नसल्याचे स्पष्ट केले. जागा अंतिम होईल तेव्हा सांगू असे देखील पवार यांनी स्पष्ट केले. पुरंदर विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पुरंदर तालुक्यातील जागेसाठी विरोध केल्याने दोन्ही पवार यांनी जागा निश्चितीबाबत अशी विधाने करून गुगली टाकल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘होय ! पटोलेंच्या वक्तव्याने गैरसमज होतोय, त्यांनी विचारपूर्वक….’; वळसे-पाटलांनी दिली कबुली
- ‘जे काँग्रेस नेते भाजपला घाबरतात त्यांना पक्षातून हाकलून द्या’, राहुल गांधींची सडेतोड भूमिका
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘पवार हे धोकेबाज नाहीत तर ते देशाचे नेते आहेत, राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना बळीचा बकरा करू नये’
- ‘भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
