Share

‘कोणी कितीही आरोप करा, माझ्यावर ईडीची कारवाई होणार नाही!’ अनिल परब यांचा दावा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीबाबत केलेल्या आरोपांचा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक तपास करून अहवाल सादर केला होता. त्याच्या आधारावर ईडीने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. देशमुख यांच्यानंतर महाविकास आघाडीतील परिवहनमंत्री अनिल परब यांचा क्रमांक लागणार असल्याचे भाजपाचे नेते म्हणत आहेत.

परब यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले होते. त्यामुळे परब यांच्यावर देखील ईडीची कारवाई होणार याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. परंतू अद्याप ईडीची कारवाई झाली नाही. दरम्यान, आज औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या अनिल परब यांनी या मुद्द्यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी कोणी कितीही आरोप करा, माझ्यावर ईडीची कारवाई होणार नाही असा दावा केला.

मंत्री परब म्हणाले, ‘अद्याप माझ्यावर ईडीकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. माझी चौकशी देखील नाही. भविष्यातही ती होणार नाही. त्यामुळे विरोधकांना कितीही चर्चा करायची असली तर त्यांनी ती खुशाल करावी. मला ईडीचा धोका नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही.’

काय आहे प्रकार?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनूसार, दापोली जवळील मुरुड समुद्र किनाऱ्यावर लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच २०२० मध्ये अनिल परब यांनी आलिशान साई रिसॉर्ट बांधले. जून २०१९ मध्ये अनिल परब यांनी जमीन घेतली. मात्र, सात बारा नावावर केलेला नाही आहे. तसंच २०२० मध्ये ठाकरे सरकारच्या अधिकारांचा दुरुपयोग करुन सगळे नियम धाब्यावर बसवून समुद्र किनाऱ्यावर, CRZ मध्ये आलिशान रिसॉर्ट बांधला. रिसॉर्ट बांधून झाल्यावर अनिल परब यांनी ते रिसॉर्ट २९ फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांचे भागीदार आणि शिवसेना नेते सदानंद कदम यांच्या नावावर केला, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!