Share

प्रामाणिक पणाचा सुखद अनुभव! हॉटेलचालकाने सापडलेले मंगळसूत्र केले पोलिसांकडे सपुर्द

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या शेजारी असणाऱ्या त्रिमूर्ती अप्पा नाश्ता सेंटरचे मालक अप्पासाहेब श्रीराम घोडे वय ३७ यांना त्यांच्या हॉटेल परिसरात अज्ञात महिलेचे मंगळसूत्र सापडले, त्यांनी सापडलेले ते मंगळसूत्र प्रामाणिक पणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे ते सुपूर्द केले. त्यामुळे घोडे यांचा प्रामाणिक पणाचा सुखद अनुभव बघायला मिळाला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दि. १५ रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांची भेट घेऊन त्यांना घोडे यांनी सांगितले की, दि. १४ रोजी अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात ग्राहकाचे सोन्याचे मनीमंगळसूत्र त्यांना हॉटेलमध्ये सापडले. त्यानंतर त्यांनी कोणी तरी ग्राहक मनीमंगळसूत्र शोध घेण्यासाठी येईल यासाठी त्यांनी एक दिवस ते त्यांच्या ताब्यात ठेवले.

दरम्यान, त्या मनीमंगळसुत्राबद्दल कोणीही विचारपूर करण्यासाठी न आल्याने त्यांनी ते आघाव यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांनी गौरी ज्वेलर्सचे आदित्य दहिवाल यांना बोलावत ते सोन्याचे असल्याची खात्री करून घेत त्याची किंमत ४० हजार असल्याचे कळाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी घोडे यांच्या निस्वार्थी तसेच प्रामाणिक पणाचे कौतुक करत, त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. तसेच ज्यांचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे, त्यांनी धोंडे यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!