🕒 1 min read
औरंगाबाद : मिटमिटा भागात महापालिकेतर्फे विकसित केल्या जाणाऱ्या सफारी पार्कसाठी आणखी १२५ एकर जमीन मिळण्याची महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सफारी पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रशासन आता कामाला लागलेले असून जमिनीची मोजणी करण्यासाठी गुरुवारी महापालिका व भूमापन अधिकारी पाहणीसाठी गेले होते. त्यानुसार ५८ हेक्टर जमीन मिळविण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.
महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची जागा अपुरी पडत आहे त्यामुळे हे प्राणी संग्रहालय मिटमिटा भागात विकसित केले जाणाऱ्या सफारी पार्क मध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेला शंभर एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. सुमारे १४५ कोटी रुपये खर्च करून सफारी पार्कचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सफारी पार्कच्या कामाचा आढावा घेतला.
हे प्राणिसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या संदर्भात मंगळवारी (दि.२०) नगर विकास मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यानुसार महापालिकेने सफारी पार्कसाठी अतिरिक्त जमीन मिळविण्याची तयारी सुरू केली आहे. उपायुक्त भूमापन अधिकारी शेवलीकर स्मार्ट सिटीचे सहाय्यक आयुक्त इम्रान खान यांनी मिटमिटा येथे जागेची पाहणी केली. भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीन मोजणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. मंगळवारच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं’; ज्येष्ठ अभिनेत्रीकडे उपचारासाठीही नाहीत पैसे
- ‘अजूनही निकालाचे सर्व्हर डाऊनच ; ठाकरे सरकार नाकर्ते असल्याचे पुन्हा सिद्ध झाले’
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘अजूनही वेळ गेलेली नाही, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर शिवसेनेनं…’
- काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्व तयार होऊ द्यायचेच नाही – भाजपा


