🕒 1 min read
पुणे : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कधीही अपेक्षित नसणारी राजकीय आघाडी झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. हे सरकार आल्यानंतर कधी काळी मैत्री असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला पाहायला मिळालं आहे.
दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे शिवसेना आणि भाजपच्या युतीसाठी आग्रही असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. मागील काही दिवसांपासून सेना-भाजपच्या नेत्यांच्या भेटीच्या चर्चा सुरु असून आठवले यांनी युती होत असल्यास त्याच स्वागत असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेची गळचेपी होत असून त्यांनी पुन्हा भाजपसोबत येऊन युती करावी अशी ऑफर दिली आहे.
आज पुण्यातील पत्रकार परिषेदत रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसाठी मैत्रीचा हात पुढे केला आहे. ‘दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर शिवसेनेने भाजप सोबत यावे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला अमलात आणायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही’, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने स्वत:चे नुकसान थांबवले पाहिजे, असे नमूद करताना यात भाजपचेही नुकसान होऊ शकेल, असं देखील आठवले म्हणाले. तसेच, भाजप आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र राहिले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता येणार नाही,’ असा दावाही आठवले यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार’
- जेजुरीगडाच्या विकासासाठी अजित पवारांचा पुढाकार ! दिला तब्बल ‘इतका’ निधी
- अनिल देशमुखांविरोधात ईडीची मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त
- नाना पटोले काहीही बोलले तरी महाविकास आघाडीला धोका नाही – अजित पवार
- कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये कोणत्याचं खेळाडूची जागा सुरक्षित नाही : मोहम्मद कैफ


