Share

RBI चा मास्टरकार्डला दणका! झाली ‘ही’ मोठी कारवाई

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी स्टेट बँक असो किंवा गावातील पतसंस्था, यांच्यावर एकच शिखर बँक नियंत्रण ठेवते. ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावले आहेत.

त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने मास्टरकार्ड एशिया/पॅसिफिक पीटीईवर बंदी आणली आहे. पुरेशी मुदत देऊनही संस्थांना पेमेंट सिस्टम डेटा संग्रहित करण्याच्या सूचनांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. २२ जुलै २०२१ पासून त्याच्या कार्ड नेटवर्कवर नवीन स्थानिक ग्राहक (डेबिट, क्रेडिट किंवा प्रीपेड) जोडू शकणार नाहीत, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अ‍ॅक्टच्या कलम १७ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा उपयोग करून ही कारवाई करण्यात आली आहे, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र या आदेशाचा मास्टरकार्डच्या विद्यमान ग्राहकांवर परिणाम होणार नाही.

याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेने मुंबईतील सारस्वत सहकारी बँक 25 लाख आणि एसव्हीसी सहकारी बँक 37.50 लाख दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक 1 कोटी 12 लाख 50 हजार  आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!