Share

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाचा कारवाईस नकार ; सुचवला नवा मार्ग

Published On: 

मुंबई : सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी कोर्टात याचिका दाखल केली होती.  याचिकेत सुशांतच्या जीवनावर आधारित विविध चित्रपटांवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. पण न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका फेटाळली होती.

यामुळे दिल्ली हायकोर्टानं ‘न्याय : द जस्टीस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरही स्थगिती लावण्यास नकार दिला होता. हा चित्रपट दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित असल्याची चर्चा आहे. ‘न्याय: द जस्टिस’, ‘सुसाइड ऑर मर्डर : अ स्टार वॉज लॉस्ट’, ‘शशांक’ आणि आणखी एका चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख केला होता. हे सर्व चित्रपट सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित आहेत.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने ‘न्याय : द जस्टिस’ या चित्रपटाविरोधात कडक कारवाई करण्याऐवजी हायकोर्टाने सुशांतचे वडील केके सिंह यांना चित्रपटाच्या निर्मात्यांशी चर्चेद्वारे हे प्रकरण मिटवण्यास सांगितले आहे.

सुशांतच्या वडिलांच्या या चित्रपटावर बंदी घालण्याच्या याचिकेवरवर कोणतीही कारवाई करण्यास नकार न्यायालयाने नकार दिला आहे. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती राजीव म्हणाले की, ही बाब कोर्टाबाहेरच्या चर्चेतून देखील सुटू शकते. कोर्टाचा हा प्रस्ताव दोन्ही बाजूंच्या वकिलांनी मान्य केला. आता चर्चेच्या माध्यमातून सुशांतच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, ते या चित्रपटाची कहाणी बदलतील किंवा यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!