Share

‘१४,००० धावांचा विक्रम कर्णधार पोलार्डला समर्पीत’, – ख्रिस गेल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाला सलग तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचे तोंड बघावे लागले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १४२ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने केवळ चार गडी गमावत सहज पार केले. यासह वेस्ट इंडिजने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

सामन्यानंतर बोलताना गेलने सामन्यातील शानदार कामगिरीचे श्रेय कर्णधार पोलार्डला दिले आहे. यावेळी तो म्हणाला,’गेल्या काही दिवसापासुन मला धावा करताना संघर्ष करावा लागत होता. याकाळात कर्णधार कायरान पोलार्ड नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे आजच्या सामन्यातील अर्धशतक आणि १४,००० धावांचा विक्रम मी त्याला समर्पीत करतो.’ असे गेल म्हणाला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पोलार्ड दुखापतीमुळे खेळत नसुन त्याच्याजागी निकोलस पुरन संघाचे नेतृत्व करत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल. ख्रिस गेलने या सामन्यात ३८ चेंडुत ४ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारासंह सर्वाधीक ६७ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान ख्रिस गेलने मिचेल मार्श टाकत असलेल्या नवव्या षटकातील पहिल्या चेंडुवर षटकार मारताच टी-२० क्रिकेटमध्ये १४,००० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!