Share

अखेर अंनिसच्या मागणीला यश ! कथित राजकीय गुरु येमुलवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल

Published On: 

पुणे : बाणेर (पुणे) येथील कथित गुरू रघुनाथ येमुल यांच्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेच्या मागणीनुसार जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. रघुनाथ येमुल यांनी सांगितल्यानुसार संबंधित पीडित महिलेशी कुटुंबीय नातेवाईक यांनी जादूटोणा प्रकार केला होता.

यासोबतच, कुटुंबीय नातेवाईक यांनी त्या महिलेला शारीरिक, मानसिक त्रास, शिवीगाळ, अश्लील भाषेचा वापर, आर्थिक पिळवणूक केली होती. त्यानुसार येमुल यांच्यासह नऊ आरोपींच्या विरोधात पुण्यातील चतुःशृंगी पोलीस ठाण्यात हुंडा प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड विधान संहिता, कलम 498 अ आदी कलमाद्वारे गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती.

मात्र या प्रकरणात जादूटोणा प्रकार झाल्याचे महाराष्ट्र अंनिसने निदर्शनास आणू दिले होते. महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने संबंधित आरोपींवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. चतुःशृंगी पोलिसांनी संबंधित आरोपींवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचे कार्यकर्ते विशाल विमल, सचिन नेलेकर, प्रवीण खुंटे, संदीप कांबळे, लालचंद कुवार, वनिता फाळके, रविकिरण काटकर आदी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी कठोरपणे तपास करून आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. तथाकथित गुरूने याही अगोदर अनेकांना अशाप्रकारे अंधश्रद्धेचे प्रकार करून फसविले असणार आहे, त्यामुळे पोलिसांनी प्रसारमाध्यमांद्वारे फसवणूक झालेल्या लोकांना संबंधीत गुरू विरोधात तक्रार देण्यासाठी आवाहन करावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!