Share

‘इंदुरीकर त्यांच्या कीर्तनातून महिलांबाबत बदनामीकारक विधान करत होते तेव्हा ही कुठे होती ?’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळतं. सध्या ती एका पोस्टमुळे चांगलीच ट्रोल होत आहे. हेमांगीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या शीर्षकाखाली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले आहे. यावरून वाद निर्माण झाला असून अनेक कलाकारांनी तिचे समर्थन केलं आहे.

आता वेळोवेळी स्त्रियांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्टद्वारे या वादावर भाष्य केलं आहे. त्यांनी हेमांगी कवीच्या पोस्टचं स्वागत करतानाच इतर वेळी जेव्हा स्त्रियांच्या वेशभूषांबाबत समाजातील दिग्गज व्यक्ती टिप्पणी करतात तेव्हा हे विरोध करण्यासाठी पुढे का नाही येत असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. तृप्ती देसाई यांनी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुकरीकर महाराज यांना देखील लक्ष्य केलं आहे.

तृप्ती देसाई यांची फेसबुक पोस्ट जशास तशी –

सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही. त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे , सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे.परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी…

जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो, अनेक ठिकाणी बंदी घातली जाते याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही. इंदुरीकर तर जाहीरपणे महीलांच्या वेशभूषा वर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असत त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो? असो उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली ‘हे ही नसे थोडके’ मनापासून शुभेच्छा.

https://www.facebook.com/trupti.desai.589/posts/4172255226197701

माझी तर या जानेवारीपासूनच मनात एक संकल्पना अशी आहे की आमच्या भूमाता फाऊंडेशन च्या माध्यमातून यावर्षीपासून आपल्या महाराष्ट्रात  “#नो_ब्रा_डे” साजरा केला पाहिजे. कृतीतून जेवढा संदेश जाईल तेवढा बदल होण्यास सोपे जाते. विरोध होईलच परंतु पुढाकार घेऊन करणेही तितकेच गरजेचे आहे. आम्ही जेव्हा हा दिवस साजरा करू तेव्हा स्वतःहून तुम्ही यात सहभागी व्हाल हीच अपेक्षा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!