Share

काँग्रेसचा भाजपला धक्का; पटोलेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आंबेडकर चळवळीचे नेते मिलिंद अहिरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भाजप पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याचबरोबर नागपूर कारागृहाचे निवृत्त अधिक्षक हिरालाल जाधव यांनी त्यांच्या सहकार्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या प्रयत्नाने मिलिंद अहिरे व हिरालाल जाधव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  पक्षप्रवेशानंतर नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र देखील सोडलं.

‘भारतीय जनता पक्ष नेहमी सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीच्या वेळी अनेक समाजातील नेत्यांना खोटे आश्वासने देऊन पक्षात समाविष्ट करून घेतात, परंतु फक्त निवडणुकीपुरताच भाजप त्यांचा वापर करते. मिलिंद अहिरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी योग्य वेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना काँग्रेस पक्षात योग्य स्थान देऊन त्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यात येईल. हिरालाल जाधव यांच्या अनुभवाचा काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे,’ असं नाना पटोले म्हणाले.

मिलिंद अहिरे हे दलित पँथर व बहुजन समाजपार्टी पुणे शहराचे अध्यक्ष होते. पुणे शहरात अनेक आंदोलनात व मोर्चात त्यांचा सहभाग आहे. हडपसर मुंढवा येथील शिंदे वस्तीमधील राजू भंडारी आणि त्यांचे भाजप कार्यकर्ते निलेश सकपाळ, सागर लोंढे, तानाजी स्वर्गे, रमेश ढगारे, सुरज कांबळे, हाफिस मुजावर, संतोष जाधव, विश्वास पोखरकर, विनायक गोरडे, ओकांर सुरवसे, अनिकेत शिंदे, राकेश साठे, सचिन गरड आदींना नाना पटोले यांनी तिरंगी मफलर घालून पक्ष प्रवेश दिला. गौरव बोराडे यांच्या पुढाकाराने आणि नायनेश शिनलकर व विशाल जाधव यांच्या सहकार्याने हा प्रवेश पार पडला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!