🕒 1 min read
अहमदाबाद : देशाचे गृहमंत्री अमित शहा हे अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात भाजपची आणि पोलीस प्रशासनाची दंडेलशाही पाहायला मिळाली आहे. अहमदाबाद पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याआधी वेजलपूर भागातील काही सोसायट्यांच्या लोकांना त्यांच्या घरांचे दरवाजे, खिडक्या बंद करण्याचे आदेश दिले होते.
आज सोशल मिडीयावर अशाप्रकारचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट दिसत आहे. या मेसेजनुसार पोलिसांनी सोसायटींच्या अध्यक्षांना पत्र पाठविली आहेत. यामध्ये कम्युनिटी हॉलमध्ये अमित शहा येणार आहेत. या रस्त्यावर आणि बाजुने असलेल्या इमारतींमधील घरांचे दरवाजे आणि खिड्या बंद ठेवण्यात याव्यात. जर बंद ठेवल्या नाही तर कारवाई केली जाईल, अशी ताकीद या पत्रात दिली आहे.
पोलिसांनी वेजलपूरच्या स्वामीनारायण आणि स्वाती अपार्टमेंटसह अन्य सोसायट्यांच्या अध्यक्षांना पत्र लिहिले होते. अमित शहा यांना झे़ड प्लस सिक्युरिटी आहे, व्हीआयपी गेस्ट इथे येत असल्याने घरांचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवण्यात याव्यात. असे न केल्यास कारवाई करणार की नाही याबाबत या पत्रात लिहिण्यात आले नसल्याचे पडताळणीत समोर आले आहे.
‘सोसायटीच्या लोकांना खिडक्या, दारे बंद ठेवण्याची विनंती केली आहे. अशा प्रकारे व्हीआयपी लोकांची ये-जा होते तेव्हा आम्ही लोकांना अशाप्रकारची विनंती करतो. त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असते. असे न केल्यास व्हीआयपींच्या मुव्हमेंटमध्ये सुरक्षेसंबंधी बाधा येऊ शकते.’ असा खुलासा एलटी ओडेदरा पोलिस अधिकारी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी औरंगाबाद पालिकेचा आता समांतरच्या निधीवर डोळा!
- ‘ऊसतोड कामगारांना २० कोटींचा निधी म्हणजे वाझोंटी मदत’, आ.धस यांची टीका
- बदलापूर वक्फ मिळकती प्रकरणात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात यावा – खासदार इम्तियाज जलील
- सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोनामुळे माता-पित्याचं छत्र हरपलेल्या दोन मुलींची जबाबदारी !
- शिक्षण थांबू देणार नाही…सुनिल शेळकेंकडून फी सवलतीसाठी ‘इतक्या’ लाखांचे अर्थसहाय्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

