🕒 1 min read
पुणे : गेल्या दीड वर्षपासून कोरोना महामारीने जगासह देशभरात थैमान घातले आहे. या महामारीत देशभरात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात अनेक चिमुरड्यांच्या डोक्यावरील माता-पित्याचे छत्र हरपले अशात या बालकांचे काय होणार ? असा प्रशन प्रत्येक संवेदनशील मनाला पडणे साहजिक आहे. राज्य आणि केंद्र सरकारने असा बालकांची जबाबदारी उचलली आहेच पण काही नेते देखील पुढे येऊन अशा बालकांच्या संगोपनाची जबाबदारी घेत आहेत.
अशातच पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील घोणे दांपत्याना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला त्यांच्या मागे दोन लहान मुली आहेत. त्यात मोठी मुलगी बारामती येथील आत्याकडे राहत आहे, तर लहान मुलगी भोर येथील आत्याकडे राहत आहे. या दोन्ही चिमुकल्यांच्या संगोपनाची जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे.
दरम्यान, ‘हा त्या कुटुंबाचा निर्णय असून या दोन्ही मुलींच्या संगोपनाकडे लक्ष देण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी बारामती व भोर येथे संपर्क उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यांचे संगोपन कशा पद्धतीने होत आहे याचा दरमहा आढावा घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई व पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संवेदनशीलतेने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. याबद्दल त्यांचे मनापासून आभार’. असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- देशावर आता झिका व्हायरसचे संकट ; ‘या’ राज्यात आढळले १५ रुग्ण
- ‘तारक मेहता…’ने गाठला मैलाचा टप्पा! ३२०० भाग पुर्ण
- औरंगाबादेत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे स्मार्ट सिटी बसेसमध्ये वाढ
- बीड जिल्ह्यात शिवसेनेचे १२ जुलैपासून शिवसंपर्क अभियान
- राज्यात पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये – बाळासाहेब थोरात


