Share

बीड जिल्ह्यात शिवसेनेचे १२ जुलैपासून शिवसंपर्क अभियान

Published On: 

बीड : शिवसंपर्क अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार, असे प्रतिपादन बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले. माजलगाव, वडवणी, धारूर, परळी, अंबाजोगाई, केज येथील सर्व शिवसैनिकांना संदेश देताना ते बोलत होते.

महाराष्ट्रात मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करत शिवसेनेने मराठी मातीतील माणसाला एकत्र करण्यासाठी शिवसंपर्क अभियान दि. १२ ते २४ जुलैदरम्यान आयोजित केले आहे. शिवसैनिकांनी हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जाधव यांनी माजलगाव येथे बैठकीत बोलताना केले.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली कामगिरी महाराष्ट्र सरकार करत आहे, बेरोजगारांसाठी नवीन नोकरभरती, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाबरोबरच आरोग्यदायी जीवन मिळावे यासाठी अथक परिश्रम करून शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ न देता ज्ञान पोहोचण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले आरोग्य योजनेद्वारे आरोग्याचे प्रश्न सोडवणे, तसेच सर्वसामान्य माणसांना चांगले जीवन जगता यावे यासाठी विविध प्रकारे मदत सरकार करत आहे. या सर्व योजनांची आणि कामांची माहिती सामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!