औरंगाबाद : सायकलस्वार आणि पायी चालणाऱ्यांसाठी शहरातील रस्ते सुरक्षित बनवण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीद्वारे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशावरून अण्णाभाऊ साठे चौकात फुटपाथवरच तारेचे कुंपण करण्यात आले होते. याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी त्वरित आदेश देत हे तार कुंपन हटवण्यात आले आहे. याविषयी मनपा आयुक्तांना कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेवरून मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यातील तणाव पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे
जिल्हाधिकारी कार्यालय जवळ असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकात चक्क फुटपाथवरच तारेचे कुंपण करण्यात आले होते. नेहरू गार्डनला लागून असलेल्या या तारेच्या फेन्सिंगमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जागा आटली होती. याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिका आयुक्त अास्तिक कुमार पांडेय यांनी उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून हे फेंन्सिंग केल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर आता मनपा आयुक्तांच्या आदेशावरून या तारा या ठिकाणाहून हटवण्यात आल्या आहेत. उद्यान विभागाने खांब आणि तार काढून घेतली आहे.
त्यामुळे येथील फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून फुटपाथवर तारेचे कुंपण करण्याचे आदेश महापालिकेच्या उद्यान विभागाला देण्यात आले होते. मात्र हे आदेश परस्पर देण्यात आल्याचे समजते. याविषयी मनपा आयुक्तांशी साधी चर्चाही करण्यात आलेली नाही. शिवाय उद्यान विभागाने देखील आयुक्तांना पूर्वकल्पना न देता हे काम केले. त्यांची कुठलीही मंजुरी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेच्या आईचे निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- अन् केंद्राने ट्विटरला आणले वठणीवर ; ट्विटरकडून तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती
- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! औरंगाबादेत लवकरच सुरु होणार शाळा
- बीडमध्ये भाजप अडचणीत, पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरूच
- ‘डोळ्यात पाणी आणि गाडीत तेल’ ; इंधन दरवाढीवर केदार शिंदेंचं खोचक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

