🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोना मुक्त गावात शाळा सुरू करणे शक्य असल्याने स्थानिक प्रशासनाकडून त्यादृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. १५ जुलैपासून कोरोमामुक्त गावातील शाळा सुरू झाल्यानंतर शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि.११) औरंगाबादेत दिली.
लॉकडाऊन मुळे शिक्षणात खंड पडल्यामुळे बालविवाह, बालमजुरी, मुला मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग कोरोना मुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले. गावात प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाइन शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती.
आता कोरोना मुक्त गावात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानूसार १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर शहरी भागातील शाळांचा मार्ग मोकळा होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रदर्शनाआधीच चित्रपट विवादात ; फरहान अख्तरच्या ‘तुफान’वर लव्ह जिहाद पसरवण्याचा आरोप
- मोठी बातमी : लखनऊमध्ये बॉम्ब बनवणाऱ्या अल-कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक
- मुख्यमंत्री ठाकरेकडुन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलांकाराना ‘माझा पुरस्कार’ प्रदान
- दहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचारी बडतर्फ
- ‘सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर…’; पटोलेंच्या विधानाने आघाडीतील बिघाडी उघड


