Share

‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मागील वर्षी (2020) 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना चकित केले होते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती  घेतली तरी देखील धोनी आयपीएल खेळत आहे. आता धोनी आयपीएल मधून देखील निवृत्ती घेणार असल्याचं मोठं वक्त्यव्य धोनीचा जवळचा मित्र आणि भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने केले आहे.

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच्या २०२२ च्या पर्वात खेळताना दिसणार नाही. असं मोठं वक्तव्य सुरेश रैनाने यावेळी केलं आहे. एका वहिनीला दिलेल्या मुलाखतीत रैना म्हणाला, ‘धोनीभाई पुढच्या पर्वात खेळणार नसेल तर मी देखील खेळणार नाही. मी २००८ पासून माहीसोबत खेळत आहे. आम्ही सोबतच आयपीएल सोडणार! सीएसके २०२१ च्या पर्वात जिंकला तरी मी धोनीला कायम राहण्याची विनंती करेन. मी देखील कायम असेल.’ धोनी आणि रैना यांनी एकाचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर धोनीने निवृत्तीची घोषणा करताच रैनानेही पाठोपाठ निवृत्तीची घोषणा केली होती.

पुढे रैना म्हणाला, ‘मी आणखी चार ते पाच वर्षे क्रिकेट खेळू शकेन. आयपीएलच्या पुढच्या पर्वामध्ये दोन संघांची भर पडणार आहे. मी मात्र जोपर्यंत आयपीएलमध्ये असेल तोपर्यंत चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडूनचं खेळणार,’ असे सुरेश रैनाने स्पष्ट केलं  आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!