औरंंगाबाद : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सोमवारी (दि.१२) औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान गृहमंत्री वळसे पाटील हे पोलिस आयुक्तालयात बैठक घेवून जिल्ह्यासह औरंगाबाद परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सोमवार दुपारी १२.०५ वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे औरंगाबाद येथे आगमन होईल. दुपारी २ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणी बाबत बैठक घेणार आहेत.
त्यानंतर, दुपारी ४ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्तालयांतर्गत कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणीबाबत बैठक घेणार आहे. मंगळवारी (दि.१३) सकाळी त्यांचा वेळ राखीव राहणार आहे. रात्री ८.२० वाजता चिकलठाणा येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या’, आ.दानवेंची ठाकरे सरकारकडे मागणी
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
- ‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला
- ‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना
- मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

