कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झाले आहेत. सारथी वगळता इतर कोणत्याच मराठा समाजाच्या मागण्याबाबत सरकार पातळीवर हालचाली होताना दिसत नाहीत, त्यामुळे दिलेल्या मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मूक आंदोलन करावे लागेल, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत दिला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन राज्यात सुरू झाले. कोल्हापूर, नाशिक या ठिकाणी मूक आंदोलन करण्यात आले. आता संभाजीराजे छत्रपतींनी ज्या काही मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. आपल्या मागण्यांबाबत चालढकल केली जात आहे याबाबतही संभाजीराजे यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, आपल्या सहा मागण्या होत्या. त्याबाबत काही हालचाली होत आहेत. पण बाकीच्या मागण्यांबाबत अजून काही निर्णय झालेले नाहीत.
एमपीएससीच्या २१८५ तरुणांच्या मुलाखतीबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा. अजित पवार यांना पुन्हा एकदा फोन करून विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले. सारथी संस्थेचे अध्यक्ष विजय निंबाळकर आणि संभाजीराजे यांची सारथी संस्थेबाबत चर्चा झाली. सारथी संस्थेला जो काही निधी द्यायचा आहे तो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तत्काळ द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांना तुम्ही शांतपणे आंदोलन का करताय असं विचारल्यावर माझा स्वभावच शांत आहे, ओरडून दंगा करून काय उपयोग ? कधी आवाज वाढवायचा हे मला नक्की कळतं आणि छत्रपती घराण्यात माझा जन्म झाला म्हणून सारखी तलवार काढून चालणार नाही, अशी समजच संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सामना गमावला तरीही चर्चा भारताच्या ‘सुपरवुमन’ हरलीनची
- संजय राठोड लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार ? शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान
- जुलै महिन्यात ११ दिवस विविध राज्यांत बँक राहणार बंद
- नवख्या इंग्लंडपुढे पाकिस्तानचे लोटांगण! ९ गडी राखुन दणदणीत पराभव
- महागाई विरोधात काँग्रेसचा आंदोलनांचा धडाका, पुण्यातील सायकल यात्रेला मोठा प्रतिसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
