Share

सामना गमावला तरीही चर्चा भारताच्या ‘सुपरवुमन’ हरलीनची

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या भारतीय महिला संघाचा टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडच्या संघाने ७ गडी गमावत १७७ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ८ षटके झाल्यानंतर पावसाचा व्यत्यय आला आणि अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला १८ धावांनी विजय मिळवला.

सामना जरी गमावला तरी भारतीय महिला क्रिकेटपटु हरलीन देओलने क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले. पावसामुळे निकाल न लागलेल्या या सामन्यात पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजी सुरु होती. इंग्लंडच्या डावातील १९व्या षटकातील पाचवा चेंडु इंग्लंडची फलंदाज एमी जोन्सने षटकाराच्या उद्देषाने चेंडु उंच मारला. चेंडु सहज सिमापार होईल असे वाटत असताना हरलीनने सिमारेषेवर एक थरारक झेल घेतला.

हरलीनने सिमारेषेच्या काही इंच दुर झेल पकडत चेंडु पुन्हा हवेत फेकला. यानंतर तिचा तोल गेला आणि ती सिमारेषेपार गेली. मात्र चेंडु पुन्हा खाली येत असताना तिने हवेत सुर मारत सुरेख झेल टिपला. अविश्वसणीय झेल घेतल्यानंतर हरलीनला सुपरवुमन म्हणले जात आहे. यादरम्यान अनेक भारतीय मान्यवरांनी तिच्या या क्षेत्ररक्षणाचे कौतुक केले आहे. दुसऱ्या डावात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडला १८ धावांनी विजयी घोषीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!