🕒 1 min read
मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आहे. पाकिस्तानने दिलेल्या १४२ धावांचे लक्ष्य इंग्लंडने १ गडी गमावत सहज पार केले. साकिब महमुदला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कोरोनामुळे संपुर्ण नवा संघ घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कोरोनाच्या शिरकावामुळे बेन स्टोक्सच्या नेतृत्वात युवा खेळाडुनी पाकिस्तानच्या अनुभवी फलंदाजीची दाणादाण उडवली. इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानने साक्षात लोटांगण घातले. पहिल्या डावात पाकिस्तानचा संपुर्ण डाव ३५.२ षटकात १४१ धावांत गडगडला. फाखर झमानने ६७ चेंडुत ६ चौकारासंह सर्वाधीक ४७ धावांची खेळी केली.
Unbeaten fifties from Dawid Malan and Zak Crawley guide England to a nine-wicket win in the first #ENGvPAK ODI.
The hosts chase down 142 comfortably in 21.5 overs ????
Scorecard: https://t.co/eXSo1NBXVi pic.twitter.com/dhbnmdnJoD
— ICC (@ICC) July 8, 2021
इंग्लंडकडुन या डावात साकिब महमुदने ४२ धावांत ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात इंग्लंडने १४२ धावांचे लक्ष्य टी-२० च्या अंदाजाच धडाकेबाज फलंदाजी करत २२व्या षटकात केवळ १ गडी गमावत पार केले. इंग्लंडकडुन डेव्हीड मलनने ६९ चेंडुत ८ चौकारासंह ६८ धावांची खेळी साकारली. जॅक क्रॉलीने(५८) त्याला पुरेपुर साथ दिली. ४२ धावात ४ गडी बाद करणाऱ्या साकिबला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- महागाई विरोधात काँग्रेसचा आंदोलनांचा धडाका, पुण्यातील सायकल यात्रेला मोठा प्रतिसाद
- कोरोनामुक्त गावातील शाळा सोमवारपासून सुरू करा;पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना
- कोरोना प्रादुर्भावामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत घेण्यात आला ‘हा’ निर्णय
- राज्यात आज 10,458 रुग्णांना डिस्चार्ज, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच -अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
