🕒 1 min read
पुणे : पुणे शहरात मे महिन्याच्या मध्यानंतर दुसऱ्या कोरोना लाटेतील रुग्णांच्या आकडेवारीत घसरण सुरु झाली. एप्रिल-मे महिन्यात दिवसाला ७-८ हजारांच्या घरात रुग्णांची संख्या गेलेली होती. ही रुग्णसंख्या आता शेकड्याच्या घरात आली असली तरी नव्या बाधितांची संख्या गेले काही दिवस वाढत आहे.
कोरोनामुक्ताच्या संख्येपेक्षाही नव्या कोरोना रुग्णांची संख्या हि अधिक असल्याने पुन्हा एकदा सक्रिय रुग्णांची संख्या हि ३ हजारांपार गेली आहे. अशा वेळी पुणेकरांनी बेफिकिरी न करता अधिक काळजी घेऊन नियमांचे पालन करण्याची गरज आहे.
आज (दि. ०९ जुलै) रोजी पुणे शहरात तब्बल ३१४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८१ हजार २२७ इतकी झाली आहे. शहरातील २३१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६९ हजार ५६७ झाली आहे.
तर, पुणे शहरात सध्या ३ हजार ०१८ ऍक्टिव्ह (सक्रिय) रुग्ण आहेत. त्यापैकी २३१ रुग्ण गंभीर तर ४७९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सहकार खातं सुरु करण्यामागे त्यांचा हेतू काय?, त्यामागे वेगवेगळे कंगोरे असू शकतात’
- ‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
- गोकुळ दूध दरात वाढ : गायी-म्हशीच्या दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ !
- पंकजाताई म्हणाल्या भाजपला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही; तर फडणवीस म्हणाले…
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
