🕒 1 min read
कोल्हापूर : राज्यात गोकुळ दुधाला मोठी मागणी आहे. खासकरून मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ दुधाचा मोठा खप आहे. राज्यातील सर्वात मोठा दूध संघ म्हणून ओळख असलेल्या गोकुळमध्ये या वर्षी तब्बल २५ वर्षानंतर सत्तापालट झाला. यानंतर, गोकुळला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सत्ताधारी गटाने सांगितले. दूध उत्पादकांना फायदा मिळण्यासाठी खरेदी दरात वाढ केली जाईल अशी घोषणा मंत्री सतेज पाटील यांनी केली होती.
आज झालेल्या बैठकीत गोकुळ दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दूध उत्पादकांना फायदा होणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसणार आहे. गोकुळ दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची तर गायीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 जुलै पासून दरवाढ लागू होणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. तर, कोल्हापूर जिल्हा वगळता ही दरवाढ लागू होणार आहे. विक्री दरात 2 रुपयांनी वाढ होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात गोकूळ दूध संघाने देखील दूध विक्री दारात 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता याचा फटका मुंबई आणि पुणेकरांना बसणार आहे. अमूल पाठोपाठ गोकूळ दूध संघाचा दूध विक्री दर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे दूध ग्राहकांना फटका तर दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारने देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार?’ ; पटोलेंचा टोला
- ‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
- ‘इंजिनचा प्रॉब्लेम हा काँग्रेस पक्षाला, केंद्रातही आणि राज्यातही’ ; फडणवीसांचा टोला
- पंकजाताई म्हणाल्या भाजपला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही; तर फडणवीस म्हणाले…
- बाचाबाची झाली पण भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही – फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
