पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विविध कार्यक्रमांसाठी आज पुणे दौऱ्यावर होते. यांनतर त्यांनी पत्रकार परिषदेत विधानसभेत झालेल्या गोंधळावर व १२ भाजप आमदारांच्या निलंबनावर देखील भाष्य केलं आहे. भाजपच्या एकही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही. शिवीगाळ कोणी केली हे मी योग्य वेळी सांगेन, असं भाष्य केलं आहे.
‘मी गेले २२ वर्षे सभागृहात आहे. महाराष्ट्रात मी कोणाला आवडू अथवा न आवडू पण माझी एक प्रतिष्ठा आहे. त्या आधारावर मी सांगतो, भाजपच्या एकाही नेत्याने शिवीगाळ केलेली नाही. बाचाबाची झाली, ती देखील आंतर ठेवून झाली. जे लोक आमच्या अंगावर आले आणि शिवीगाळ केली याची नीट माहिती घ्या. ते कोण होते हे मी योग्य वेळी सांगेनच. आता एवढंच सांगतो भाजपच्या एकही सदस्याने पीठासीन अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली नाही किंवा शिवीगाळ देखील केलेली नाही. हे कुभांड आहे,’ असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आम्ही सरकारला उघड्यावर पाडले. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीला फासावर चढवण्याचे काम केल्यामुळेच आमच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील,’ असं देखील फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे – नवाब मलिक
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- ‘कोरोना संकटात जीव धोक्यात घालून काम केले, आता औरंगाबाद मनपाकडून हीन दर्जाची वागणूक; स्मशानजोगी समाजाची खंत
- ‘काँग्रेसने देशाला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे केले परंतु मोदी सरकारने हे वैभव विकण्याचा सपाटा लावलाय’
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
