Share

‘कोरोना संकटात जीव धोक्यात घालून काम केले, आता औरंगाबाद मनपाकडून हीन दर्जाची वागणूक; स्मशानजोगी समाजाची खंत

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांवर दीड वर्षात महापालिकेमार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले. या कामासाठी स्मशानजोग्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रशासनाला मोलाची साथ दिली. मात्र अद्याप त्यांना पैसे देण्यात आलेले नाही. त्यामुळे सुमारे दोन हजार अंत्यसंस्कार करण्यासाठीचे पन्नास लाख रुपये थकले आहेत. त्याचबरोबर स्मशानजोगी यांचे चार महिन्यांचे वेतन थकीत आहे. आम्ही जीव धोक्यात घालून काम करत असताना पालिकेने आमची हिच किंमत केली का? असा सवाल स्मशानजोगींनी उपस्थित करत मनपा प्रशासनावर निशाणा साधला.

एका अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये दिले जातात. मात्र हे पैसे वेळेत मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून स्मशानजोगी त्रस्त आहेत. सध्या कोरोना कालात जीव धोक्यात घालून केलेल्या अंत्यसंस्कारासाठी पैसे मिळत नसल्याने स्मशानजोगी यांनी महापालिकेत धाव घेऊन आपला संताप व्यक्त केला आहे. पुष्पनगरी स्मशानजोगीचे गोविंद गायकवाड म्हणाले, मागील चार महिन्याची लाकडाचे पैसे आणि पगार नसल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीत आलो आहोत. पुष्पनगरी स्मशानभूमीत गेल्या चार महिन्यात एक हजारहून अधिक जणांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

याशिवाय मोफत अंत्यसंस्कार योजनेतून अडीच हजार जणांचे अंत्यसंस्कार झाले. यासाठी लागणाऱ्या लाकडाचे पैसे मात्र अजूनही मनपाने आम्हाला दिलेले नाही. गतवर्षी मार्च ते जून पर्यंत शहरात दोन हजार पेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिकेने नियुक्त केलेल्या स्वयंसेवी संस्था आणि स्मशानजोगी यांनी अंत्यसंस्कार केले. शहरातील ४० स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. मात्र प्रामुख्याने मुकुंदवाडी, पुष्पनगरी, सेंट्रल नाका येथील वैकुंठ धाम प्रताप नगर बेगमपुरा आंबेडकर नगर आणि कैलासनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याशिवाय याच दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!