Share

खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडी(ED)ने एकनाथ खडसे यांचीही चौकशी केली आहे. तब्बल ९ तास ही चौकशी सुरू होती. खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही चौकशीचे समन्स ईडीने बजावले आहे . परंतु त्यांनी ईडीने वेळ वाढवून मागितली असल्याची माहिती मिळत आहे.

याप्रकरणी आता अन्न वा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर काय त्रास होतो हे हे खडसेंना दाखवायचं आहे त्यामुळे ईडी चौकशी केली जाते आहे, त्यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे असं आता छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. अन्य पक्षातले लोक भाजपमधे गेले की त्यांचे गुन्हे माफ होतात. जे लोक भाजप सोडून अन्य पक्षांमध्ये जातात त्यांना त्रास दिला जातो. एकनाथ खडसे आणि आम्ही सगळेजण त्यांना निश्चितपणे उत्तर देऊ असाही इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात असल्याचा आरोप केला आहे. भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे. ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचं खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. दरम्यान भाजपला वाटत असेल की, या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!